दररोज घराबाहेर पडून वाजवतो वाद्य
कुठल्या देशाच्या नागरिकाने कितीही प्रगती केली, कितीही पैसा कमाविला तरीही स्वतःचा देश आणि देशाच्या हुतात्म्यांबद्दल आभार व्यक्त करणे सोडू नये, कारण या हुतात्म्यांमुळेच त्याला सुख-समृद्धीचा हा टप्पा गाठता येत असतो. आमचे सैनिक आणि त्यांच्या बलिदानामुळेच आम्हाला निर्धास्तपणे घरी राहता येत असते. हुतात्म्यांना त्यांचे साथीदार कधीच विसरत नाहीत. अलिकडेच अमेरिकेतील एका वृद्धाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यात तो माजी सैनिकांच्या सन्मानार्थ दररोज विशेष काम करताना दिसून येतो.
हा वृद्ध व्यक्ती घराबाहेल बिगुल वाजवताना दिसून येतो. प्रत्येक देशाचे सैनिक तेथील नागरिकांसाठी सन्माननीय असतात. या वृद्ध व्यक्तीनेही स्वतःचे कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पडले आहे. मूळा हा व्यक्ती अमेरिकेचा माजी सैनिक आहे. व्हिडिओत माजी सैनिक घराबाहेर बिगुल वाजवताना दिसून येतो. बिगुलवर टॅप करण्याचा अर्थ विशेष संगीत वाजविणे असा होतो. या विशेष संगीताद्वारे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते.
टॅप्सला नागरी युद्धादरम्यान लाइट बंद करण्यासाठी वापरले जात होते. या व्यक्तीचे नाव जेस असून दररोज न चुकता घराबाहेर येत हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहत असतो. या व्हिडिओला 8 लाखाहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. प्रत्येक जण या व्यक्तीचे कौतुक करत आहे.