प्रतिनिधी / बेळगाव : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकमान्य सोसायटीतर्फे चित्रगाथा स्वातंत्र्याची हे प्रदर्शन भरवण्यात आले. सोमवार दि. 1 ऑगस्ट रोजी आरपीडी कॉलेजच्या लायब्ररीमध्ये भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन लोकमान्य सोसायटीचे चेअरमन व एस केई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, विठ्ठल याळगी, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, मधुकर सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रदर्शनात एकूण 385 छायाचित्रे आहेत. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा दिला त्यांच्या छायाचित्रात बरोबरच त्यांचा संक्षिप्त परिचय छायाचित्र खाली देण्यात आला आहे. त्यामुळे हे प्रदर्शन माहितीमध्ये भर घालणारे आहे.
ही छायाचित्र अकोला जिल्ह्यातील जयंत सहस्रबुद्धे यांनी स॑ग्राहीत केली आहेत. सर्व वयोगटातील लोकांनी या अनोख्या प्रदर्शनाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.