जपानमधील पारंपरिक वाद्य
सर्व देशांची स्वतःची संस्कृती आणि परंपरा असते. तेथील पोशाखापासून नृत्य-गायनातही या संस्कृती अन् परंपरेची झलक दिसून येते. अशाच प्रकारचे एक पारंपरिक वाद्य सध्या वादात सापडले आहे. जपानमधील हे वाद्य अन्य वाद्यांप्रमाणेच दिसते, परंतु त्याच्या निर्मिती सामग्रीमुळे हा वाद निर्माण झाला आहे.
जपानमध्ये वाजविण्यात येणारे पारंपरिक वाद्य शामिसेन हे गिटारप्रमाणेच दिसते आणि लोकही आवडीने हे वाद्य वाजवत असतात. या वाद्याच्या निर्मितीसाठी मांजराच्या कातडीचा वापर होत असल्याने प्राणिहक्क गट या वाद्यावर आक्षेप घेत आहेत.
शामिसेन नावाचे हे वाद्य पारंपरिक टी हाउसशी निगडित आहे. याचा अद्वितीय टोन एक मेम्ब्रेनमधून येतो, पाळीव मांजरांच्या कातडय़ापासून तयार करण्यात येतो. हे वाद्य पूर्वी मलबेरी, चंदनाच्या लाकडापासून तयार केले जायचे, ज्यात रेशीम आणि हस्तिदंताचाही वापर करण्यात येत होता. परंतु आता याच्या सामग्रीला सिंथेटिग गोष्टींनी बदलण्यात आले आणि मांजराच्या कातडय़ाचा वापर होऊ लागला. दुसऱया महायुद्धापासून हा बदल अंगिकारला गेला.
दुसऱया महायुद्धाच्या अखेरीस 200 प्रोफेशनल कॅट नॅपर्स जपानमध्ये होते. दशकांपासून शामिसेन तयार करण्यासाठी जपानमध्ये मांजरांना पकडण्यात येते आणि त्यांच्या त्वचेचा वापर करण्यात येतो. प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी याच्या विरोधात आवाज उठविल्यावर प्राण्यांची कातडी चीन आणि थायलंडमधून आयात करण्यात येऊ लागली.