Tarun Bharat

डंपरची धडक बसून वृद्धाचा जागीच मृत्यू

Advertisements

डंपरच्या मागील चाकाखाली चिरडून झाला मृत्यू

वेंगुर्ले/वार्ताहर-

दाभोली-खानोली नजीक दाभोली हळदणकरवाडी येथे गुरांसाठी चारा नेणारा बाबुराव उर्फ बाबलो गंगाराम मयेकर (63) हा दाभोलीकडे जाणाऱ्या खडी वाहक डंपर KA-70- 3087 ची धडक बसून पाठीमागील चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू पावला. ही घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली.  या घटनेचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक अतुल जाधव यासह पोलीस पथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाले तसेच दाभोली सरपंच उदय गोवेकर पोलीस पाटील जनार्दन पेडणेकर, कोतवाल सुभाष खानोलकर मिलन चव्हाण, उपसरपंच सुभाष खानोलकर, खानोली ग्रामसेवक प्रसाद अंधारी यासह स्थानिक ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. या मार्गावरून पुढील प्रवासासाठी जात असलेल्या वेंगुर्ले-दाभोलीमार्गे सांगली तसेच दाभोली मार्गे कुडाळ याबरोबरच दाभोली मार्ग वेंगुर्लेकडे येणाऱ्या एसटी बस गाड्याही अपघाताच्या अन्य खाजगी वाहने अपघाताच्या दुसऱ्या बाजूला या रस्त्यावर अडकून पडलेले होती. हा अपघात ज्या ठिकाणी घडला. त्या ठिकाणाहून बाबुराव मयेकर यांचे घर सुमारे सातशे मीटर अंतरावर होते.

Related Stories

वस्त्रहरणकारांचे ‘विठ्ठल विठ्ठल’ लवकरच रसिकांच्या भेटीला!

Patil_p

ओसरगावला पावणेदोन लाखाची दारू जप्त

NIKHIL_N

सावंतवाडीत सक्रिय रुग्णसंख्या तीन

NIKHIL_N

जिह्यात 50 टक्के लसीकरण

Patil_p

मलेरियाचे 32 रुग्ण आढळले

NIKHIL_N

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!