Tarun Bharat

ओढय़ात कार उलटून इचलकरंजी येथील वृद्धाचा मृत्यू

प्रतिनिधी /बेळगाव

भरधाव कार ओढय़ात उलटून हसूर (ता. इचलकरंजी) येथील एका वृद्धाचा मृत्यू झाला तर कारमधील अन्य पाच जण जखमी झाले. बैलहोंगल-बेळवडी रोडवर संपगावजवळ रविवारी सायंकाळी हा अपघात घडला आहे. बैलहोंगल पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.

मनोहर आण्णाप्पा मानगाव (वय 72, रा. हसूर, ता. इचलकरंजी) असे अपघातात ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. मनोहर यांची पत्नी सुप्रभा मनोहर मानगाव (वय 60, रा. हसूर), सौम्या संतोष अक्की (वय 36), दिवीजा संतोष
अक्की (वय 18), समेक संतोष अक्की (वय 12), संतोष बाबु अक्की (वय 46, सर्व रा. संपगाव, सध्या रा. अनगोळ) हे जखमी झाले आहेत.

संतोष अक्की हे कार चालवत होते. कारमध्ये त्यांचे कुटुंबीय होते. बेळगावहून संपगावला जाताना कार ओढय़ात उलटून सहा जण जखमी झाले. त्यांना खासगी इस्पितळात हलविण्यात आले. रविवारी रात्री उपचाराचा उपयोग न होता मनोहर यांचा मृत्यू झाला. बैलहोंगल पोलीस स्थानकात या अपघाताची नोंद झाली आहे. पोलीस निरीक्षक यु. एच. सातेनहळ्ळी व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.

Related Stories

आता राज्यात 24-7 प्राथमिक आरोग्य केंद्रे

Patil_p

बेळगाव-मुंबई विमानसेवा आजपासून होणार पूर्ववत

Patil_p

हिंडलगा कारागृहातील पाच कैद्यांची सुटका

Amit Kulkarni

उघडय़ा चेंबरवर झाकण घालण्याकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

कोरोना महामारीमुळे जनावरांच्या बाजारांचा झालाय वांदा

Omkar B

कौन्सिल सेक्रेटरींसह मनपातील आठ कर्मचारी सेवानिवृत्त

Amit Kulkarni