Tarun Bharat

अरगन तलावाजवळील भुयारी गटारीमुळे अपघातास निमंत्रण

अरुंद रस्त्यामुळे गांधी चौकाजवळ अपघाताचा धोका

प्रतिनिधी /बेळगाव

संरक्षण खात्याकडून अरगन तलाव परिसरातील खुल्या जागेत कोटय़वधीचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मात्र, नागरिकांना भेडसावणाऱया समस्यांचे निवारण करण्यासाठी निधी नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अरगन तलावाजवळील भुयारी गटार वाहनधारकांना धोकादायक बनली असून रात्रीच्यावेळी अपघात होण्याची दाट शक्मयता आहे.

बेळगाव-वेंगुर्ला रोडची पावसामुळे वाताहत झाली असून वाहनधारकांना या रस्त्यावरून ये-जा करताना कसरत करावी लागत आहे. विशेषतः अरगन तलाव परिसरातील रस्त्यावरून ये-जा करताना वाहनधारकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. लक्ष्मी टेकडी परिसरातील दूषित पाणी गटारीद्वारे सोडण्यात येते.   सदर पाणी अरगन तलावामध्ये सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हे पाणी अरगन तलावामध्ये सोडण्यासाठी कित्येक वर्षांपासून गांधी चौकाजवळ भुयारी गटार करण्यात आली आहे. पण भुयारी गटार असलेल्या ठिकाणचा कठडा वाहनामुळे कोसळला आहे. त्यामुळे या ठिकाणी भुयारी गटार असल्याचे वाहनधारकांच्या निदर्शनास येत नाही. बेळगाव-वेंगुर्ला रस्त्यावर दुचाकी वाहनांसह अवजड वाहनांची वर्दळ मोठय़ा प्रमाणात असते. अशातच अरगन तलाव परिसरातील रस्ता वाहून गेल्यामुळे खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनधारक खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करीत असतात. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याचा धोका आहे. भुयारी गटार असलेल्या ठिकाणी रस्ता अरुंद असल्याने काहीवेळा अवजड वाहने गटारीमध्ये अडकतात. या ठिकाणी असलेला कठडा खराब झाल्याने वाहनधारकांना अधिक धोका निर्माण झाला आहे. भुयारी गटार असल्याचे रात्रीच्यावेळी लक्षात येत नाही. वळणावर असलेल्या भुयारी गटारीमुळे अपघात घडण्याची शक्मयता आहे. त्यामुळे भुयारी गटारीचे बांधकाम करून आवश्यक खबरदारी घेण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

Related Stories

मतदान प्रक्रियेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक

Omkar B

विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

Amit Kulkarni

अतिवाड गाव नॉट रिचेबल : मोबाईलधारक हैराण

Omkar B

शंकरगौडा पाटील यांनी दिल्लीत स्वीकारली सुत्रे

Patil_p

गुडशेफर्ड, भरतेश, एमव्हीएम उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

जोतिबाचा चैत्र उत्सव यंदाही साधेपणाने

Amit Kulkarni