खानापूर प्रतिनिधी : हेब्बाळ येथे अनोळखी मृतदेह सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. खानापूर नांदेड रस्त्यावर असलेल्या हेब्बाळ गावात हरी मंदिर च्या बाजूला आप्पाजी गुरव व मारुती बष्टेकर यांच्या घराच्या मधल्या जागेत मृतदेह असल्याचे निदर्शनास आल्याने, हेब्बाळ गावात एकच खळबळ माजली आहे. हेबाळ येथे शुक्रवार सायंकाळी लहान मुले खेळताना लपल्यासाठी गेली असता भीतीने आरडाओरडा करत आल्याने गावातील जेष्ठ लोकांनी जाऊन पाहीले असता अनोळखी मृतदेह दिसून आला. यानंतर नंदगड पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली .नंदगड पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खानापूला पाठवला आहे. मृतदेह पाहून पाच-सहा दिवसापूर्वी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पुढील तपास नंदगड पोलीस करत आहेत


next post