क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद क्रिकेट कोचिंग अकादमी आयोजित 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत उद्घाटनदिवशी आनंद क्रिकेट अकादमी संघाने सीसीआर संघाचा 97 धावानी पराभव करून विजयी सलामी दिली. ओम जकातीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे भोमाण्णा पोटे, इम्प्तियाज काजी, प्रभाकर बिजल, प्रशांत लायंदर, आनंद करडी, सुनील देसाई व ईश्वर इटगी आदी मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आनंद क्रिकेट अकादमी अ संघाने 40 षटकात 5 बाद 225 धावा केल्या. ओम जकातीने 74 तर निलेश आर. ने 69 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयं आर.ने 7 धावात 2, श्रेयाने 8 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना सीसीआय संघाचा डाव 32.4 षटकात सर्व बाद 128 धावात आटोपला. समर्थ व आरव एन. यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. आनंदतर्फे श्लोकने 3 तर सुप्रितने 2 गडी बाद केले.