विश्रुत चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : युनियन जिमखाना आयोजित विश्रुत चिट्स प्रायव्हेट लिमिटेड पुरस्कृत विश्रुत चषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी आनंद आकादमी संघाने अर्जुन स्पोर्ट्स संघाचा तर एसकेईने सीसीआयचा पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. अथर्व करडी, आदित्य जाधव यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावर पहिल्या सामन्यात अर्जुन स्पोर्ट्स संघाने 25 षटकात 9 बाद 72 धावा केल्या. उत्तरादाखल आनंद क्रिकेट अकादमी संघाने 13 षटकात 2 बाद 74 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला.
दुसऱया सामन्यात सीसीआयने 25 षटकात 7 बाद 133 धावा केल्या. वेदांत बिजलने 3 षटकार 3 चौकारांसह 50 धावा करून अर्धशतक झळकविले. स्वयम खोतने 24 धावा केल्या. एसकेईतर्फे नितांत पावस्कर, समर्थ कोकणे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. उत्तरादाखल एसकेई संघाने 23.4 षटकात 5 बाद 134 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. आदित्य जाधवने नाबाद 52 धावा करून अर्धशतक झळकविले. समर्थ पाटीलने 25, सिद्धार्थ हेडाने 18 धावा केल्या. सीसीआयतर्फे स्वयम खोत, खंडू पाटील, विनायक शिरुरकर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.