Tarun Bharat

आनंद अकादमी, बीएससी ब संघ विजयी

बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक 12 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद अकादमीने युनियन जिमखान्याचा चार गडय़ांनी तर बीएससी ब संघाने अ संघाचा 2 गडय़ांनी पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. प्रज्योत उघाडे, अमर पटवेगार यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात युनियन जिमखान्याने युनियन जिमखानाने 25 षटकात 5 बाद 142 धावा केल्या. अर्जुन येळ्ळूरकरने 5 चौकारासह 43, शाहरुख धारवाडकरने 5 चौकारासह 45, सुरज सकरीने 16, अब्बास किल्लेदारने 11 धावा केल्या. आनंदतर्फे समर्थक रेड्डीने 2, अद्वैत चव्हाणने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 24.5 षटकात 6 बाद 146 धावा करुन सामना चार गडय़ांनी जिंकला. अमर पटवेगारने 25, अथर्व करडी व सुरज जुवेकर यांनी प्रत्येकी 22 धावा केल्या. जिमखानातर्फे सुरज सकरी व अद्वैत पाटीलने प्रत्येकी 2 तर महम्मद हमजाने 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात बीएससी अ संघाने 14 षटकात सर्व बाद 60 धावा केल्या. इम्तियाज मंडलने 10 धावा केल्या. बीएससी ब तर्फे अनिल बांडगीने 3, विवीन कामत व ओम आजरेकर यांनी प्रत्येकी 2 तर समर्थ व आयुष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससी ब संघाने 22.1 षटकात 8 बाद 61 धावा करुन सामना दोन गडय़ांनी जिंकला. त्यात प्रज्योत उघाडेने 19, ओम आजरेकरने 16 धावा केल्या. बीएससी अ तर्फे अवनिश मुंगारेने 3, लक्ष्य खतायतने 2, काविश, प्रितम व इम्तियाज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या स्पर्धेचे उपांत्य फेरीचे सामने शनिवारी खेळविण्यात येणार आहेत.

Related Stories

केंद्रसरकार चा हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न

mithun mane

पावसामुळे बसस्थानकात डबकी

Amit Kulkarni

निपाणीत शिक्षक भरती परीक्षा सुरळीतपणे सुरू

Patil_p

दिवाळीत कर्नाटकात फक्त ग्रीन फटाक्यांना परवानगी

Archana Banage

गरीब-गरजू वकिलांना बार असोसिएशनची मदत

Patil_p

हॅण्डलूम फॅब प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद

Patil_p