Tarun Bharat

आनंद अकादमीचा विजय

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए ए डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत आनंद क्रिकेट अकादमी संघाने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाचा 8 गड्यांनी पराभव करुन 2 गुण मिळविले. 20 धावात 5 गडी बाद करणारा हर्ष पॅटरॉट हा सामनावीर ठरला.

बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब संघाने प्रथम फलंदाजी करताना 29.2 षटकात सर्वगडी बाद 107 धावा केल्या. त्यात केदार उसूलकरने 31, अर्णव नुगानट्टीने 22 तर आर्यन कुंदपने 15 धावा केल्या. आनंदतर्फे हर्ष पॅटरॉटने 20 धावात 5 तर रोहित पाटीलने 35 धावात 4 गडी बाद केले.प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 11.1 षटकात 2 गडी बाद 108 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात ज्ञानेश होनगेकरने 4 षटकार 3 चौकारासह 40, राहुल नाईकने 9 चौकारांसह नाबाद 38 तर रोहित पाटीलने 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्सतर्फे प्रथम मासमर्डी व हर्ष पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Related Stories

बेळगाव होणार वैमानिक प्रशिक्षण शहर

Amit Kulkarni

अट्टल सायकल चोराला अटक : 13 सायकली जप्त

Amit Kulkarni

कोनवाळ गल्ली नाला बांधकामाचा शुभारंभ

tarunbharat

सावधान…. आगीच्या घटना वाढताहेत…

Amit Kulkarni

अटी व नियांसह होणार विमानप्रवास

Patil_p

कोरोना हद्दपार होईपर्यंत मास्क वापरणे आवश्यक

Patil_p