प्रतिनिधी /बेळगाव
दि इन्स्टिटय़ूट ऑफ इंडियन फौंड्रीमेन बेळगाव शाखेची बैठक नुकतीच झाली. यावेळी नूतन पदाधिकाऱयांची निवड करण्यात आली. चेअरमन म्हणून आनंद देसाई, व्हा. चेअरमन म्हणून आदित्य पारिख, कार्यकारी सचिव म्हणून गौरव पंडित व खजिनदार म्हणून विक्रम सैनुचे यांची निवड झाली. या बैठकीला संस्थेचे सर्व सदस्य व राजकोटच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फौंड्रीमेनचे सदस्य उपस्थित होते.