Tarun Bharat

आनंद महिंद्रा यांच्या ‘फादर्स डे’ निमित्त भावनिक पोस्टवर नेटकरी भावूक

ऑनलाईन टिम : मुंबई

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक छायाचित्र शेअर करून फादर्स डे निमित्त एक भावनिक पोस्ट केली आहे. या पोस्टवर नेटिझन्सनी प्रतिक्रिया देऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. या पोस्टमध्ये आनंद महिंद्रांनी आपल्या वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांचे पुन्हा स्वागत करण्यासाठी विमानतळावर जाण्याची इच्छा व्यक्त केली.

या पोस्ट मध्ये आनंद महिंद्रा यांनी एक फोटो ट्विट केला आहे. ब्लॅक अँड व्हाईट असलेला या फोटोमध्ये लहान आनंद महिंद्रा आपल्या वडिलांसोबत हातात पुष्पगुच्छ घेऊन उभे असल्याचे दिसून येतात. या पोस्टच्या खाली त्यांनी लिहल आहे की, “लहानपणी, व्यावसाईक सहलीवरून परतलेल्या माझ्या वडिलांना भेटण्यासाठी त्यांचे विमानतळावर स्वागत करणे नेहमीच विशेष होते. आजच्या #FathersDay च्या निमित्ताने त्यांचे पुन्हा स्वागत करण्यासाठी विमानतळावर जावं असे वाटत आहे.”

पोस्ट शेअर केल्यापासून केवळ दोन तासात या पोस्टला 5,000 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत. आणि 300 हून अधिक रिट्विट्स मिळाले आहेत. या पोस्टवर नेटिझिन्सनी अनेक भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Related Stories

कोल्हापूर : आरक्षण हक्क कृती समितीचा आक्रोश मोर्चा, निदर्शने

Archana Banage

जैशच्या निशाण्यावर अजित डोवाल

Patil_p

भाजप आमदार उंटवाल यांचे निधन

Patil_p

..त्यानंतरच हे आंदोलन संपेल : राहुल गांधी

Archana Banage

कोल्हापूर : अकाऊंट हॅक, 29 लाखांची फसवणूक

Archana Banage

लॉकडाऊननंतर उद्योजकांसमोर आता नवीन संकट

datta jadhav