Tarun Bharat

आनंद, आरसीसी गोवा, एआयएम, निना विजयी

सुरेश गडकरी चषक क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

आनंद क्रिकेट अकादमी आयोजित सुरेश गडकरी चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळवण्यात आलेल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी संघाने सुनील नायक अकादमी सावंतवाडीचा 8 गड्यांनी, निना संघाने साई दुर्गा संघाचा 66 धावांनी, आरसीसी गोवा संघाने टिळकवाडी अकादमीचा 105 धावांनी, एआयएम सावंतवाडी संघाने बेळगाव स्पोर्टस् क्लबचा 92 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. अद्वैत चव्हाण, पीयुष सावंत, फराज जिहान, काविश परब यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

पहिल्या सामन्यात आरसीसी गोवा संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 151 धावा केल्या. त्यात काविश परबने 42, अनय इलकानीने 24 धावा केल्या. टिळकवाडीतर्फे अखिलने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी अकादमीचा डाव 14 षटकात 46 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. आरसीसीतर्फे स्वप्नील नायकने 3 तर निर्वाणने दोन गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात सुनील नायक क्रिकेट अकादमी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 123 धावा केल्या. त्यात समर्थ यशने 53, आदित्यने 19 धावा केल्या. आनंदतर्फे अद्वैत चव्हाण दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 20 षटकात 2 गडी बाद 127 धावा करत सामना 8 गड्यांनी जिंकला. त्यात अद्वैत चव्हाण 46, अथर्व करडी 34 धावा केल्या. सावंतवाडीतर्फे यशने एक गडी बाद केला.

तिसऱ्या सामान्यात निना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 139 धावा केल्या. त्यात कृष्णा पिसेने 37, श्रीराम अभिषेकने एक गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई दुर्गाचा डाव 17 षटकात 73 धावात आटोपला. हरी साईने 12 धावा केल्या. निनातर्फे अकीबने 3 गडी बाद केले. चौथ्या सामन्यात एआयएम सावंतवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 132 धावा केल्या. त्यात फरहान आगाने 38, प्रसाद नाईकने 35 धावा केल्या. बीएसईतर्फे समर्थ व आयुष यांनी एक गडी बाद केल. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएसईचा डाव 13 षटकात 40 धावात आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. सावंतवाडीतर्फे पीयुश सावंतने 3 गडी बाद केले.

Related Stories

मटका, जुगारी अड्डे चालकांना धडकी

tarunbharat

दोन म्हशींचा जागीच मृत्यू

Rohit Salunke

गटारीमधील विविध वाहिन्या हटवा

Amit Kulkarni

हंदिगनूर येथील 10 वर्षाच्या बालकाला कोरोना

Tousif Mujawar

‘लोकमान्य’च्या उचगाव शाखेतर्फे ऋचा पावशे हिचा गौरव

Amit Kulkarni

स्मार्ट बसथांबा बनला पार्किंगतळ

Amit Kulkarni
error: Content is protected !!