Tarun Bharat

काँग्रेस हायकमांडवर आनंद शर्माही नाराज

Advertisements

हिमाचलमधील सुकाणू समिती अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह थांबण्याचे नाव घेत नाही. पक्षाचे ज्ये÷ नेते गुलाम नबी आझाद यांच्यानंतर आता आणखी एक बडे नेते आनंद शर्मा पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. आनंद शर्मा यांनी रविवारी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक सुकाणू समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून राजीनामा दिला आहे. राज्यसभेतील काँग्रेसचे उपनेते शर्मा यांची 26 एप्रिल रोजी हिमाचल प्रदेशातील सुकाणू समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात आनंद शर्मा यांनी आपल्याकडे पक्षनेतृत्त्वाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा उल्लेख केला आहे. आपल्याला पक्षाच्या बैठकीसाठी आमंत्रित केले जात नसून उपेक्षा सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. यापूर्वी गेल्याच आठवडय़ात जम्मू काश्मीरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षनेतृत्त्वाबाबत नाराजी व्यक्त केली होती. 16 ऑगस्ट रोजी आझाद यांना जम्मू-काश्मीर प्रचार समितीचे अध्यक्ष बनवले होते. परंतु त्यांनी केवळ 2 तासांनंतरच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आपल्या शिफारशींकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नवीन जबाबदारी स्वीकारण्यास गुलाम नबी आझाद यांनी नकार दर्शवल्याचे समजते. तथापि, प्रकृती अस्वास्थ्यामुळे आझाद यांनी प्रचार समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे.

हिमाचलमध्ये वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक

चालू वर्षाच्या अखेरीस होणाऱया विधानसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशमध्ये भाजपकडून सत्ता हिसकावून घेण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. आनंद शर्मा हिमाचल प्रदेशातील वरिष्ठ नेत्यांमध्ये गणले जातात. अशा स्थितीत शर्मा यांचा सुकाणू समितीचा राजीनामा काँग्रेससाठी तोटय़ाचा ठरू शकतो. सध्या त्यांनी काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले असले तरी निर्णयप्रक्रियेपासून लांब राहण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे.

आनंद शर्मा यांचा राजकीय प्रवास

माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पहिल्यांदा 1982 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होते. 1984 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले. शर्मा तेव्हापासून राज्यसभा सदस्य असून त्यांनी पक्षात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

Related Stories

उत्तराखंड : मुख्यमंत्री स्वरोजगार योजनेअंतर्गत 70 हजार लोकांना मिळणार रोजगार

Tousif Mujawar

निजामुद्दिनमधील कार्यक्रमात कर्नाटकातील 342 जण सहभागी

Patil_p

1 हजार कोटीपेक्षा अधिक मूल्याची मालमत्ता जप्त

Patil_p

भाजप संसदीय मंडळात येडियुराप्पांची वर्णी

Patil_p

सुमीतून सर्व भारतीय विद्यार्थी बाहेर

Patil_p

दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 10 हजार 630 वर

Tousif Mujawar
error: Content is protected !!