Anandayatri’s Chandanzhula Kavisamela on October 8 at Vengurle
वेंगुर्ले येथील आनंदयात्री वाड़्मय मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेचा औचित्य साधून शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी वेंगुर्ले सुंदरभाटले येथील साई दरबार हाॅल मध्ये दुपारी 3:30 ला ‘चांदणझुला’ हे कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे कवीसंमेलन वेंगुर्ले तालुका मर्यादित असून कवीवर्य विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कवीसंमेलनात कवीनी आपली स्वरचित एक कविता सादर करावयाची आहे. काव्यरसिकांसाठी ही एक पर्वणीच आहे. तरी रसिकांनी या कवीसंमेलनाचा लाभ घ्यावा. नवोदित कवींच्या कविता ऐकाव्यात व नवोदिताना आपल्या उपस्थितीने प्रोत्साहन द्यावे. असे आवाहन आनंदयात्रीच्या संयोजक वृंदा कांबळी व प्रा. सचीन परुळकर, संजय पाटील, महेश राऊळ यानी केले आहे.
वेंगुर्ले / प्रतिनिधी