Tarun Bharat

अनंत चोपडे, शिवा थापा उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ अमन (जॉर्डन)

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताचा मुष्टियोद्धा अनंत चोपडेने 54 किलो वजनगटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. त्याने शुक्रवारी झालेल्या लढतीत जपानच्या तेनाका शोगोचा पराभव केला.

शुक्रवारी झालेल्या या लढतीत अनंत चोपडेने जपानच्या शोगोवर एकतर्फी विजय नोंदविला. या लढतीमध्ये जपानच्या शोगोकडून विशेष प्रतिकार पहावयास मिळाला नाही. दुसऱया एका लढतीत थायलंडच्या पी. खुनाटिपने भारताच्या इतेश खानचा 3-2 अशा गुणांनी पराभव केला. पुरुषांच्या 63.5 किलो वजनगटात भारताच्या शिवा थापाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. शिवा थापाने मंगोलियाच्या बी. तुगुलदूरचा 3-2 असा पराभव केला. भारताच्या अमित कुमारने 67 किलो वजनगटातील लढतीत चीन तैपेईच्या हुवांगचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. 71 किलो वजनगटात पहिल्या फेरीत भारताच्या सचिनने थायलंडच्या पिरापेतचा पराभव केला. सचिनने पुढील फेरीच्या लढतीत येसूनगिनॉनचा 5-0 असा पराभव करत पुढील फेरी गाठली. या स्पर्धेमध्ये महिलांच्या विभागातील लढतींना शनिवारी उशिरा प्रारंभ होत आहे.

Related Stories

अश्विन, जडेजाला खेळवणे महत्त्वाचे ठरेल

Patil_p

पहिल्या विजयाने पाकचे स्पर्धेतील आव्हान जिवंत

Patil_p

‘बापू’चा झंझावात, विंडीज नेस्तनाबूत़!

Patil_p

भारतीय युवा संघाची विजयी सलामी

Patil_p

कोव्हिड-19 लढय़ात लस मिळाल्यानंतरच क्रिकेट सुरु करा

Patil_p

विजयाच्या मोहिमेसाठी आज ईस्ट बंगालची लढत नॉर्थईस्टशी

Patil_p