चालकाच्या सावधगिरीमुळे महिला बचावली, कुत्रा आडवा आल्याने अपघात
प्रतिनिधी / बेळगाव
सकाळच्या सत्रात सर्वांनाच घाई असते. घाईगडबडीत ट्रकला ओव्हरटेक करून जात असताना कुत्रा आडवा आल्याने ब्रेक लावला. दुचाकी वाहनचालक महिला चक्क मागून येणाऱया ट्रकच्या समोर कोसळली. ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावल्याने सदर महिला बचावली. कुत्रा आडवा आल्याने जीव गमवावा लागला असता. मात्र दैव बलवत्तर म्हणून महिला व आणखीन एक दुचाकीचालक बचावला.
गुरुवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास रामघाट रोडवर गणेशपूर येथे हा अपघात घडला. यावेळी घडलेला अपघात पाहता सर्वजण आवाक् झाले. ट्रक चालकाच्या सावधगिरीमुळे महिलेचा जीव बचावला. या अपघाताचा प्रसंग या ठिकाणी बसविण्यात आलेल्या किराणा दुकानाच्या सीसी कॅमेऱयात कैद झाला आहे. ग्रामीण भागातदेखील भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली आहे. कुत्र्यांवर निर्बंध घालण्यास अपयश आले असल्याने याचा फटका वाहनधारकांना देखील बसत आहे.
सदर महिला बेळगावहून ज्योतीनगरच्या दिशेने जात होती. गणेशपूर येथील गणपती मंदिराच्या पुढे आल्यानंतर ट्रक व दुचाकी वाहनधारकाला ओव्हरटेक केले. याच दरम्यान कुत्रा आडवा आल्याने सदर महिलेने ब्रेक लावला. ब्रेक लावताच पावसामुळे निसरड झालेल्या रस्त्यावर महिला दुचाकी घसरून पडली. यावेळी पाठीमागून दुचाकी वाहनधारक आणि ट्रक येत होती. यावेळी महिला चारचाकी वाहनासमोर कोसळली व ट्रकच्या समोरील चाकासमोर आली. पण ट्रक चालकाने प्रसंगावधान राखून ब्रेक लावला. त्यामुळे दैव बलवत्तर पुढील अनर्थ टळला. ट्रक चालकाच्या सावधगिरीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. मात्र गर्दीच्या ठिकाणी ओव्हरटेक करण्याचे टाळणे आवश्यक असल्याची प्रचिती अपघातादरम्यान आली.