प्रतिनिधी / बेळगाव : पायाचे दुखणे असह्य झाल्याने बैलहोंगल तालुवयातील नावलगट्टी गावच्या युवकाने आपला पाय कोयत्याने तोडून घेतला आहे. घरात कोणीही नसल्याचे पाहून ऊस कापणी करणाच्या कोयत्याने त्याने स्वतःच आपला पाय तोडून टाकला. ही बाब उघड होताच ग्रामस्थांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. राजू उदगिरी ( वय २४ ) असे त्या तरुणाचे नाव आहे. डॉक्टर हा पाय पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.


previous post