Tarun Bharat

अन् पालकमंत्री वाहनातून उतरले…

Advertisements

शिंदीकुरबेट येथील वृद्ध दांपत्याने मांडली कैफीयत

प्रतिनिधी /बेळगाव

गोकाक तालुक्मयातील शिंदीकुरबेट येथील वृद्ध दांपत्य जिल्हाधिकारी कार्यालयाला नेहमीच फेऱया मारते. गेली अनेक वर्षे त्यांना घराची हक्कपत्रे दिली नाहीत. मंगळवारीही त्यांन नेहमीप्रमाणे फेरी मारली. यावेळी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांना त्या आजीने नमस्कार करून आपली कैफीयत मांडण्याचा प्रयत्न केला.

पालकमंत्री हे आपल्या वाहनात बसले होते. मात्र त्यांनी त्या आजीला पाहून तातडीने खाली उतरले. यावेळी त्यांनी आपुलकीने चौकशी केली असता मला हक्कपत्रे दिली नाहीत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आल्याचे त्या म्हणाल्या.

यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील हेही तेथेच उपस्थित होते. त्यांनी आपल्या सहाय्यक अधिकाऱयांना तातडीने त्यांची काय समस्या आहे ते पहा आणि त्यांचे काम करा, असे सांगितले. रामण्णा कडकभांवी असे त्या वृद्धाचे नाव आहे. त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हक्कपत्राची मागणी करत आहे. मात्र आम्हाला अजूनही हक्कपत्रे दिली नाहीत. त्यामुळे आम्ही अडचणीत आलो आहे. तेंव्हा तातडीने हक्कपत्रे द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

केवळ कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यास सुरुवात

Amit Kulkarni

रामदेव गल्ली मुतारीचे बांधकाम सुरू

Amit Kulkarni

कर्नाटक राज्यपालांनी सिद्धरामय्या यांना लिहले पत्र

Abhijeet Shinde

चोवीस तास पाणी योजनेंतर्गत अधिकाऱयांसाठी कार्यशाळा

Omkar B

पुन्हा रेल्वेगेटनजीक 20 मिनिटे थांबली एक्स्प्रेस!

Patil_p

जिल्हय़ात दूध उत्पादनात वाढ

Omkar B
error: Content is protected !!