Tarun Bharat

अन् बाईंनी भररस्त्यात थांबवली एस्टी बस..!

Advertisements

श्रद्धा  बेहेरे यांनी सामूहिक राष्ट्रगीतासाठी थांबवली बस

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरीहून राजापूरकडे निघालेली एसटी बुधवारी सकाळी ठीक 11 वाजता अचानक एका प्रवासी महिलेच्या विनंतीवरून थांबली. एसटीला अचानक लागलेले हे ब्रेक गाडीमध्येच सामूहिक राष्ट्रगीत गायनासाठी होते, हे नंतर इतर प्रवाशांच्या लक्षात आले.

  बुधवारी सकाळी 9.30 वाजता रत्नागिरीतून निघालेल्या या एसटीतून मिरजोळे हनुमाननगर येथील श्रद्धा सुधाकर बेहेरे प्रवास करत होत्या. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार, सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्याचे बेहेरे यांनी मनोमन ठरवले होते. त्यानुसार सकाळी 11 वाजायला काही मिनिटे असताना त्यांनी एसटीचे वाहक व चालकांना एसटी थांबण्याची विनंती केली.

  बेहेरे यांच्या विनंतीनुसार 11 वाजता एसटी थांबली आणि चालक, वाहकासह प्रवाशांनी आपापल्या जाग्यावर उभे राहून सामूहिक राष्ट्रगीत म्हणून मानवंदना दिली.  या आवाहनाला सर्वांनीच मनापासून प्रतिसाद दिला व कौतुकही केले. देशात ’स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व आबाल-वृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते.

Related Stories

‘ज्ञानेश्वर’मध्ये प्रवेश घेऊन कुठलेही पाप केलेले नाही!

Patil_p

ग्रुप बुकिंग केल्यास अन्य जिल्हय़ात एसटी

NIKHIL_N

‘रोटरी’च्या अनुष्का म्हातलेची राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी निवड

Abhijeet Shinde

पोलिसांसाठी तीन ‘कोव्हिड केअर सेंटर’

NIKHIL_N

केंद्रीय पथकाकडून वेंगुर्ल्यातही पाहणी

NIKHIL_N

जिल्हा शल्य चिकित्सकांची तातडीने बदली करा!

NIKHIL_N
error: Content is protected !!