टोरँटो : डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या टोरँटो महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत कॅनडाची तसेच माजी अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम विजेती 22 वषीय बियान्का अँड्रेस्क्मयूने एकेरीची उपउपांत्यपूर्व फेरी गाठताना फ्रान्सच्या कॉर्नेटचा पराभव केला.
गेल्या काही दिवसांपासून अँड्रेस्क्मयूची मानसिक स्थिती बिघडल्याने ती टेनिस क्षेत्रातून निवृत्त होण्याचा विचार करीत होती. पण या धक्मक्मयानंतर तिने गेल्या ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच एप्रिल महिन्यात झालेल्या स्टुटगार्ट टेनिस स्पर्धेत आपले पुनरागमन केले होते. टोरँटो स्पर्धेतील या विजयामुळे बियान्काचा निवृत्तीचा निर्णय पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्मयता वाटते. टोरँटो स्पर्धेतील झालेल्या दुसऱया फेरीतील सामन्यात अँडेस्क्मयूने फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटचा 6-3, 4-6, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.