Tarun Bharat

आंध्र प्रदेश मुख्यमंत्र्यांच्या बहिणीला अटक

हैद्राबाद / वृत्तसंस्था

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला यांना तेलंगणाची राजधानी हैद्राबाद येथे अटक करण्यात आली आहे. शर्मिला या वायएसआरटीपी या पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना घेराव घालण्याचा आदेश आपल्या समर्थकांना दिला होता.

हैद्राबाद येथील पंजागुट्टा येथे मुख्यमंत्री राव यांचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर शर्मिला यांचे समर्थक निदर्शने करीत होते. या कार्यालयाची नाकेबंदी करण्याचा आदेश त्यांना देण्यात आला होता. स्वतः शर्मिला एका कारमध्ये बसून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होत्या. पोलिसांनी त्यांच्या समर्थकांना पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शर्मिला यांना कारमधून उतरण्याची वारंवार विनंती केली. मात्र, त्या कारमध्येच बसून राहिल्या. त्यानंतर पोलिसांनी टोईंग मशिन आणून त्यांच्यासकट त्यांची कार ओढून अन्यत्र नेली.

निदर्शनांचे कारण

तेलंगणातील वारंगळ येथे दोन दिवसांपूर्वी शर्मिला यांच्या कारवर तेलंगणा राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. या दगडफेकीच्या निषेधार्थ मंगळवारी मुख्यमंत्री राव यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शनांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयाला घेराव घालण्याचीही योजना होती. ही योजना हाणून पाडण्यासाठी तेलंगणा पोलिसांनी ही कारवाई केल्याचा आरोप केला जात आहे.

Related Stories

कोरोनाचा कहर : देशात 96,424 नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 52 लाखांवर

Tousif Mujawar

टिकरी बॉर्डरवर आणखी 3 शेतकऱ्यांचा मृत्यू

datta jadhav

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापासून भाविकांसाठी खुला

datta jadhav

बिहार निवडणुकीत नवा पक्ष, लंडनमधून तरुणीचा मुख्यमंत्रिपदावर दावा

tarunbharat

17 दिवसांत 7,500 किमीची यात्रा

Patil_p

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 60 पैसे वाढ

Patil_p