‘अनेक’ चित्रपटात नायिकेच्या भूमिकेत
एंड्रिया ही मूळची नागालँडची असून या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींनी एंड्रियाचे चित्रपटसृष्टीत स्वागत केले आहे.
‘अनेक’ चित्रपटात आयुष्मान एका अंडरकव्हर पोलीस अधिकाऱयाची भूमिका साकारत आहे. तर एंड्रिया ही आईडो नावाच्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सरच्या भूमिकेत आहे. ‘अनेक’मध्ये मुख्य भूमिकेसाठी एंड्रियापेक्षा अधिक चांगला पर्याय नव्हता. ती मूळची ईशान्येतील असल्याने ही भूमिका तिच्यासाठीच योग्य होती. याचबरोबर एंड्रियाने या भूमिकेसाठी मोठी मेहनत केली असल्याचे सिन्हा यांनी म्हटले आहे.
आयुष्मान खुराना आणि अनुभव सिन्हा यांच्यासोबत काम करताना त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार की नाही याची भीती सतावत होती. परंतु दोघांनीही सेटवर अत्यंत चांगले वातावरण ठेवल्याने माझ्या मनावरील दडपण कमी झाल्याचे एंड्रिया सांगते.
बॉलिवूडमध्ये स्वागत
एंड्रियाच्या पदार्पणाबद्दल बॉलिवूड अभिनेत्रींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तापसी पन्नूने एंड्रियाचे छायाचित्र शेअर करत ‘वैविध्यात सौंदर्य असते, या सुंदर अभिनेत्रीचे आमच्या चित्रपटसृष्टीत स्वागत करुया’ असे म्हटले आहे. भूमी पेडणेकर आणि क्रीति सेनॉन, अदिती राव हैदरी, दीया मिर्झा यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत तिचे स्वागत केले आहे.