माद्रिद-स्पेन / वृत्तसंस्था
माजी अव्वलमानांकित अँडी मरेने मंगळवारी डेनिस शॅपोव्हॅलोव्हला 6-1, 3-6, 6-2 अशा फरकाने पराभवाचा धक्का देत माद्रिद टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश केला. आता पुढील फेरीत अँडी मरेसमोर जागतिक क्रमवारीतील अव्वलमानांकित नोव्हॅक जोकोविचचे तगडे आव्हान असणार आहे. 2017 दोहा फायनलनंतर हे दोन्ही टेनिसपटू आमनेसामने भिडण्याची ही पहिलीच वेळ असेल. जोकोविचने अन्य एका लढतीत फ्रान्सच्या मॉन्फिल्सचा 6-3, 6-2 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. कार्लोस ऍल्कारेझने निकोलोझ बॅसिलश्विलीचा 6-3, 7-5 असा पराभव केला. त्याची पुढील लढत नववा मानांकित कॅमेरुन नोरी व जॉन इस्नेर यांच्यातील विजेत्याविरुद्ध होईल.