लस्ट स्टोरीजच्या दुसऱया भागासाठी निवड
नेटफ्लिक्सची वेबसीरिज ‘लस्ट स्टोरीज’ 2018 मध्ये प्रदर्शित झाली होती. या सीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. ‘लस्ट स्टोरीज’च्या यशानंतर अँथोलॉजी सीरिजच्या दुसऱया भागाचे काम सुरू आहे. अँथोलॉजी सीरिजमधील आर. बाल्की यांच्या हिस्स्यासाठी अंगद बेदी आणि मृणाल ठाकूर यांची निवड झाली आहे. अंगद बेदी आणि मृणाल ठाकूर ही जोडी यामुळे पहिल्यांदाच दिसून येणार आहे.
‘लस्ट स्टोरीज’च्या पहिल्या भागात 4 कथा अनेक दिग्दर्शकांनी मिळून गुंफण्याचा प्रयत्न केला होता. जोया अख्तर, करण जौहर, अनुराग कश्यप आणि दिवाकर बॅनर्जी यांचा यात समावेश होता. रोनी स्क्रूवाला यांनी याची निर्मिती केली होती. ही सीरिज स्वतःची बोल्ड दृश्यं आणि संवादासाठी चर्चेत राहिली होती. या सीरिजमध्ये राधिका आपटे, भूमी पेडणेकर, नील भूपलम, मनीषा कोईराला, संजय कपूर, जयदीप अहलावत, नेहा धूपिया, विक्की कौशल, कियारा अडवाणी आणि आकाश ठोसर दिसून आले होते.
7 ऑगस्टपासून लस्ट स्टोरीच्या दुसऱया भागाचे चित्रिकरण मुंबईत सुरू होणार आहे. या दुसऱया भागात कोंकणा सेन शर्मा, सुजॉय घोष, अमित रविंद्रनाथ शर्मा हे कलाकार दिसून येतील.