Tarun Bharat

अंगणवाडी सेविका विनंती शेडगे यांचे निधन

Advertisements

ओटवणे /प्रतिनिधी-

देवसु पलीकडचीवाडी येथील अंगणवाडी सेविका पूर्वाश्रमीची कुंदा गंगाराम सावंत तर आताची सौ. विनंती विजय शेडगे (४५) यांचे मंगळवारी सायंकाळी उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले. देवसू पलीकडचीवाडीत अंगणवाडी सेविका असलेल्या सौ विनंती शेडगे दुर्धर आजाराने आजारी होत्या. त्यांच्यावर सुरवातीला गोवा  येथे नंतर मुंबईत उपचार केल्यानंतरही त्यांच्या तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना त्यांच्या सासरी उपवडे- दुकानवाड येथे आणण्यात आले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सर्वांनाच धक्का बसला आणि उपवडेसह देवसू गावावर शोककळा पसरली. कोरोना काळात त्यांनी स्वतःचा जीव दिसत घालून देवसू गावात उत्कृष्ट सेवा बजावली होती. बुधवारी दुपारी त्यांच्यावर उपवडेत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी, दिर, दोन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. वाहन चालक विजय शेडगे यांच्या त्या पत्नी होत तर देवसू येथील अनंत आणि सखाराम सावंत यांची ती बहिणी होत.

Related Stories

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा सिंधुदुर्ग भाजपाच्यावतीने सत्कार

Ganeshprasad Gogate

सरमळेत विजेसह नेट समस्येवर मात करीत कोरोना लसीकरण

Ganeshprasad Gogate

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांच्या हजेरीत उत्तर रत्नागिरी सपशेल नापास!

Patil_p

किसान क्रेडिट’मधून मदतीचा हात

Patil_p

चिरेखाणीत बुडून 15 वर्षीय मुलाचा मृत्यू

Patil_p

टीका करणारे निवडणुकीत पडतात

Patil_p
error: Content is protected !!