प्रतिनिधी/ बेळगाव
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी वर्कर्स अॅण्ड हेल्पर्स फेडरेशनच्यावतीने गुरुवार दि. 22 रोजी सुवर्णसौधवर मोर्चा काढण्यात येणार आहे. विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार असून अधिवेशनाच्यावेळी राज्यातील 10 हजार कर्मचारी सामील होऊन धडक देणार आहेत. सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत हे आंदोलन करण्यात येणार आहे. तेव्हा जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सकाळी 10 वाजता सुवर्णसौधसमोर उपस्थित रहावे, असे आवाहन फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष कॉ. नागेश सातेरी, सेक्रेटरी यल्लुबाई शिग्गीहळ्ळी यांनी केले आहे.