Tarun Bharat

Rajya Sabha Election 2022: कोणताही आमदार अस्थिर होणार नाही; जयंत पाटलांचे अनिल बोंडेंवर टीकास्त्र

Advertisements

मुंबई: कोणताही आमदार अस्थिर होणार नाही. त्यामुळे अफवांमध्ये तथ्य नाही. कोटा काय ठरला हे सांगायचा नसतो. पण आमची बेरीज पाहिली तर आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील, असा विश्वास जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी व्यक्त केला. राज्यसभेसाठी मतदान (Rajyasabha Election) सुरू होताच भाजपचे उमेदवार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी मतांचा कोटा वाढवला असल्याचा बॉम्ब टाकला आहे. यावरुन आघाडीत बिघाडी होणार असे बोलले जात आहे. याच मुद्यावरुन जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा- चांगली झोप लागली, भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी होतील हे जाहीर करा; धनंजय महाडिक


ते म्हणाले, अपक्ष आमदार अस्थिर व्हावेत असा विरोधकांचा प्रयत्न आहे. यासाठी ते अफवा पसरवत आहेत. मात्र कोणताही आमदार अस्थिर होणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमची बेरीज पाहिली तर आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, टप्याटप्याने मतदान कसं करायचं ही आमची स्ट्रॅटेजी आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा- LIVE : जाणून घ्या; राज्यसभा निवडणूकीचे अपडेट


अनिल बोंडे काय म्हणाले,
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ऐनवेळी आपल्या मतांचा कोटा वाढवला आहे. हा कोटा 42 वरून 44 करण्यात आल्याचा दावा अनिल बोंडे यांनी केला.

Related Stories

कोरोनावरील भारतीय लस स्वातंत्र्य दिनी रुग्णसेवेत

Abhijeet Shinde

गृहमंदिरातच विठूभक्तीचा सोहळा

Patil_p

चिंता वाढली : अकोल्यात कोरोना रुग्णांची संख्या 978 वर

Rohan_P

बावधनमध्ये अजुनही अटकसत्र सुरूच

Patil_p

नागासोबत खेळाचे व्हीडीओ सोशल मीडियावर प्रदर्शन करणाऱ्या तरुणावर गुन्हा

Sumit Tambekar

महिला स्वच्छता कर्मचाऱयांचे पगार 3 महिने रखडले

Patil_p
error: Content is protected !!