Tarun Bharat

अनिल देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ

ऑनलाईन टीम/तरुण भारत

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात अली आहे. देशमुख हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, देशमुखांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष पीएमएलए न्यायालयात आज अनिल देशमुख यांना हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयात झालेल्या सुनावणीवेळी अनिल देशमुख यांना १३ सप्टेंबर पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. (Anil Deshmukh judicial custody extended by 14 days)

अनिल देशमुख शुक्रवारी देशमुख चक्कर आल्याने तुरूंगात पडले होते. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संध्याकाळीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज देशमुख यांना विशेष पीएमएलए न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना १३ सप्टेंबर पर्यंत त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमके काय आहे प्रकरण?
गेल्यावर्षी मार्चमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. देशमुखांनी पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट व बार मालकांकडून दरमहा 100 कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता.

याप्रकरणी सीबीआयने गेल्यावर्षी एप्रिलमध्ये देशमुख व वाझे यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला.

Related Stories

ठाणे : उपचारादरम्यान 4 रुग्णांचा मृत्यू, नातेवाईकांचा ऑक्सिजन तुटवड्याचा आरोप

Tousif Mujawar

‘ही’ आहेत कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची सात लक्षणे

datta jadhav

शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला

datta jadhav

जत तालुक्यातील उटगीत विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Archana Banage

सीमाभागात बारकाईने लक्ष ठेवणार ‘भारत’ ड्रोन

datta jadhav

आरोग्यनोंदींच्या डिजिटायझेशनसाठी केंद्राचे नवीन मिशन

Abhijeet Khandekar