Tarun Bharat

अनिल परब यांना अंतरिम जामीन मंजूर

शासनाच्या फसवणूकप्रकरणी दापोलीत दाखल झाला होता गुन्हा

 वार्ताहर / दापोली

दापोली तालुक्यामधील मुरुड येथे साई रिसॉर्टचे बांधकाम अपूर्ण असताना कर आकारणीची कार्यवाही करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या माजी मंत्री, आमदार अनिल परब यांना खेड न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

 दापोली तालुक्यामधील मुरुड येथे साई रिसॉर्टचे बांधकाम पूर्ण नसतानाही बांधकामाच्या नोंदी घेऊन चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करण्यात आली होती. ही कर आकारणी करण्यापूर्वी योग्य ती खातरजमा करण्यात आली नव्हती. तसे कोणतेही पुरावे ग्रामपंचायतीकडे आढळून आले नव्हते. म्हणून या प्रकरणी दापोलीचे गटविकास अधिकारी आर. एम. दिघे यांनी दापोली पोलीस स्थानकात ऍड. अनिल परब तसेच मुरुड ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच तसेच ग्रामसेवक अनंत कोळी यांच्याविरोधात संशयित म्हणून तक्रार दाखल केली होती. दापोली पोलीस स्थानकात भादंवि कलम 420, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  यानंतर दापोलीचे पोलीस पथक मुरुड येथे चौकशासाठी दाखल झाले होते. या प्रकरणी ऍड. अनिल परब यांचे वकील सुधीर बुटाला यांनी खेड अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे. दापोलीमधील शांतता भंग होऊ नये किंवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून अधिक पोलीस कुमक मागवण्यात आल्याचेही समजते.

Related Stories

तत्कालीन सिव्हील सर्जनना किल्लीसाठी तब्बल चार नोटीसा

Patil_p

‘शाळा तिथे मुख्याध्यापकपद’

NIKHIL_N

संगमेश्वर येथील व्यापारी श्रीराम वनकर यांचे अपघाती निधन

Archana Banage

चिपळुणात तब्बल 82 जण होणार सरपंचपदी विराजमान!

Patil_p

एन. सी.सी. कॅडेट्सनी साजरा केला जागतिक वसुंधरा दिन

Anuja Kudatarkar

चिपळुणात गोवळकोट ग्रामस्थांच्या पुनर्वसासाठी एल्गार

Omkar B
error: Content is protected !!