सांगली जिल्ह्यात जनावरांचा बाजार बंद झाल्याने
प्रतिनिधी : आक्रम शेख
सांगली जिल्ह्यात लंपी स्किनच्या आजाराने हजारो जनावरे दगावल्यामुळे शेकडो जनावरांवर जिल्हा प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. लम्पीस्कीनचा प्रभाव वाढत असल्याने बाजार बंद करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांत लम्पीचा प्रादुर्भाव असल्याचे स्पष्ट झाले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत मिरजेत जनावरांचा सर्वात मोठा बाजार भरतो. तर आटपाडीमध्ये जनावरांच्या बाजारात लाखोंची उलाढाल होते. लम्पीस्कीनच्या आजारामुळे दोन महिन्यांपासून ही उलाढाल थांबली आहे. जिल्ह्यातील जनावारांचा बाजार बंद असल्य़ाने दोन मोठ्या जनावरांच्या बाजारातील तब्बल ५ कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मिरज उपबाजार समितीला ५ लाख तर..आटपाडी बाजार समितीला २ लाखाचा फटका बसत आहे.