Tarun Bharat

राज्य सरकारच्या उपाययोजनांमुळे जनावरांचा मृत्यू दर कमी- महसूल मंत्री

कोल्हापूर : राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे जनावरांचा मृत्यू दर कमी ठेवण्यात यश आले आहे. लम्पी रोगाचा प्रसार वेगाने होत आहे हे खर असून, आज सकाळपर्यंत आठशे पशुधनाचा मृत्यू झाला आहे.” अशी माहीती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. लंम्पी स्कीन संसर्गजन्य आजाराबाबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.

पुढे बोलताना ते म्हणाले, “शासनाने हाती घेतलेल्या लसीकरणाच्यामुळे या रोगाचा प्रसार कमी व्हायला मदत झाली आहे. राजस्थान आणि पंजाबच्या तुलनेत पशुधनाची संख्या जास्त असतानाही रोगावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.”

जनावरे दगावल्यावर मिळणारी रक्कम खुपच तोकडी आहे असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यावर “एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे सध्या मदत दिली जात आहे. लसीकरणाचा शंभर टक्के खर्च सध्या राज्य सरकार करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चागल्या प्रकारे मदत मदत झाली. तर कोल्हापूर जिल्ह्यात 93% लसीकरण झालं आहे.”अशी माहीती महसूलमंत्र्यांनी दिली आहे.

राजू शेट्टी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचारले असता, “राजू शेट्टी यांनी सरकारकडून एकदा वस्तुस्थिती समजून घेतली पाहीजे. यावर राजकारण होऊ नये अशी आमची इच्छा आहे.
तसेच त्यांच्या काही सूचना असतील तर त्यांनी कळवाव्यात” असे मत व्यक्त केले.

Related Stories

कुरुंदवाड नगरपालिकेच्या पोटनिवडणूकीत प्राजक्ता पाटील विजयी

Archana Banage

रामचंद्र महाराज यादव मठात कृष्ण जन्माष्टमी, ज्ञानेश्वर जयंती साजरी

Archana Banage

जागतिक परिचारिका दिनानिमित्त मंत्री यड्रावकर यांनी दिल्या शुभेच्छा

Archana Banage

‘दोषी मीच या समाजाचा, तूच मार्ग दाखव आता’

Kalyani Amanagi

कसबा बावड्यात ऊसाच्या फडास आग लागून लाखो रुपयांचे नुकसान

Archana Banage

दुचाकीवरून बेळगावला निगालेले बांधकाम मजूर ताब्यात

Archana Banage