Tarun Bharat

बॅडमिंटन स्पर्धेत अनिशला रौप्यपदक

नवी दिल्ली/ वृत्तसंस्था

थायलंडमध्ये सुरु असलेल्या 2022 च्या 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई पुरुष आणि महिलांच्या कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा बॅडमिंटनपटू अनिशने रौप्यपदक पटकाविले.

पुरुषांच्या 15 वर्षाखालील वयोगटातील एकेरीच्या अंतिम लढतीत चीन तैपेईच्या चुंग हेसेंगने अनिशचा 21-8, 22-24, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव करत सुवर्णपदक मिळविले. भारताच्या अनिशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेमध्ये भारताच्या उन्नती हुडाने 17 वर्षाखालील वयोगटातील एकेरीच्या उपांत्य लढतीत जपानच्या योकोयुचीचा 21-8, 21-17 असा फडशा पाडत अंतिम फेरीत स्थान मिळविले. भारताच्या अर्श मोहम्मद आणि संस्कार सारस्वत यांनी दुहेरीची अंतिम फेरी गाठली आहे.

Related Stories

दिल्लीत 3 हजार पेक्षा अधिक कोरोना रुग्ण

Tousif Mujawar

आंध्रप्रदेशात भीती वाढविणारे कोरोना रुग्ण

Patil_p

बिगबॉस विजेता विशाल निकम झाला हिचा मालक

Patil_p

देशात 16,738 नवीन कोरोनाबाधित; 138 मृत्यू

Tousif Mujawar

किशिदा फूमिओ होणार जपानचे पंतप्रधान

Patil_p

गुजरातमध्ये भीषण दुर्घटना, 10 जण ठार

Patil_p