Tarun Bharat

ऍनीसिमोव्हाची विजयी सलामी

Advertisements

वृत्तसंस्था/ सिनसिनॅटी

अमेरिकेत सुरू असलेल्या डब्ल्यूटीए टूरवरील हार्डकोर्ट महिलांच्या आंतरराष्ट्रीय वेस्टर्न आणि सदर्न सिनसिनॅटी टेनिस स्पर्धेत अमांदा ऍनीसिमोव्हाने एकेरीत विजयी सलामी देताना दारिया कॅसात्किनाचा पराभव केला. त्याचप्रमाणे एकतेरिना ऍलेक्झांड्रोव्हाने दुसऱया फेरीत प्रवेश केला आहे. या स्पर्धेतील पहिल्या फेरीतील सामन्यात 23 व्या मानांकित ऍनिसिमोव्हाने नवव्या मानांकित कॅसात्किनाचा 6-4, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. हा सामना 80 मिनिटे चालला होता. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात ऍलेक्झांड्रोव्हाने कॅनडाच्या लैला फर्नांडिजचा 6-4, 7-5 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. ऍलेक्झांड्रोव्हानेची दुसऱया फेरीत ओसाका किंवा शुई यांच्याशी गाठ पडणार आहे. विम्बल्डन विजेती इलेना रिबेकिनाने दुसऱया फेरीत स्थान मिळविताना मेयार शेरीफचा 6-3, 6-2 असा पराभव केला

Related Stories

अव्वल प्रथमश्रेणी क्रिकेटपटू रजत भाटिया निवृत्त

Patil_p

रूमानियाचे तीन वेटलिफ्टर्स अपात्र

Patil_p

बीसीसीआय मध्यवर्ती करारातून धोनीला डच्चू

Patil_p

इब्राहीमोव्हिक इटलीला परतण्याची शक्यता

Patil_p

पाकिस्तान, लंका महिला क्रिकेट संघ झिम्बाब्वेला रवाना

Patil_p

ऑस्ट्रेलियन महिलांची पुरुष संघाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी

Omkar B
error: Content is protected !!