Tarun Bharat

शो सोडलेली अंजली आजही कंगालच

Advertisements

एका टीव्ही चॅनेलवरील लोकप्रिय तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील अनेक कलाकारांनी आतापर्यंत मालिका सोडलेली आहे. या मालिकेतील सर्वात प्रमुख पात्र तारक मेहता याची पत्नी अंजली (खरे नाव नेहा मेहता) हिने दोन वर्षापूर्वी ही मालिका सोडली होती. तथापि त्याला अद्यापही तिच्या भूमिकेचे पैसे मिळालेले नाहीत, अशी तक्रार तिने केली आहे. नेहा मेहता यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका 2020 मध्ये सोडली. त्याआधी 12 वर्षे सलग त्या याच मालिकेतून लोकांसमोर येत होत्या. या मालिकेने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली. तथापि अनेक शोजचे पैसे मात्र मिळालेले नाहीत.

शो सोडल्यानंतर या शोच्या निर्मात्यांना आपण अनेकवेळेला फोन केला. आणि थकबाकी देण्यास सांगितले. तथापि आपल्याला दाद देण्यात आली नाही. अद्यापही चर्चाच सुरू आहे. तथापि आपण यासंबंधी कायदेशीर कारवाई केलेली नाही. लवकरच काहीना काही तोडगा निघेल अशा विश्वासावर आपण आहोत. सध्या सुनैना फौजदार या तारक मेहता यांच्या पत्नीची भूमिका निभावत आहेत. तारक मेहताचे काम करणारे शैलेश लोढा यांनीही हा शो सोडला आहे. ते या मालिकेशी सुरुवातीपासूनच जोडले गेले होते. आता या मालिकेचे निर्माते या तक्रारींवर का निर्णय घेतील याकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Related Stories

सलमानने थाटलं नव ऑफिस

Patil_p

हुमाचा नवा लुक पाहून चाहते पडले गोंधळात

Abhijeet Shinde

इरफान खानची इच्छा अपूर्णच

Patil_p

लॉ ऑफ लव्हश्श् च्या मोशन पोस्टरची दमदार एन्ट्री

Patil_p

रहस्यमय गुंत्यात अडकलेल्या नौदल अधिकाऱयाची कहाणी

Patil_p

अमृता खानविलकरची लॉकडाऊन डायरी

Patil_p
error: Content is protected !!