Tarun Bharat

अल्पसंख्याकांच्या आरक्षणात वाढ करण्याची ‘अंजुमन’ची मागणी

प्रतिनिधी /बेळगाव

राज्यातील मुस्लीम अल्पसंख्याकांचे आरक्षण वाढविण्याची मागणी उत्तर कर्नाटक अंजुमन-इ-इस्लामने केली आहे. यासंबंधी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी शनिवारी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले आहे.

कर्नाटकातील मुस्लीम अल्पसंख्याक सामाजिक व शैक्षणिकरीत्या मागासलेले आहेत. शिक्षण संस्था, सरकारी किंवा सार्वजनिक उद्योगामध्ये त्यांना योग्य स्थान मिळाले नाही. सच्चर समितीने मुस्लिमांच्या समस्यांवर प्रकाश टाकला होता. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात मागासलेल्या समाजासाठी आरक्षण वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. त्यांच्यामार्फत कर्नाटक राज्य मागास आयोगाचे अध्यक्ष जयप्रकाश हेगडे यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्वरित एका समितीची स्थापना करून सामाजिक व शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करण्यात यावा व मुस्लिमांचे आरक्षण 4 टक्क्मयांवरून 8 टक्क्मयांवर आणावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Related Stories

कौल कोणाला?, मतदार राजाच ठरणार किंगमेकर

Omkar B

कपिलेश्वर मंदिरात शिवपिंडीला 1001 आंब्यांची आरास

Amit Kulkarni

कोनेवाडीत चार गवतगंज्यांना आग

Patil_p

जमिनीला योग्य दर देण्याची शेतकऱयांची मागणी

Amit Kulkarni

शाळांना सुट्टी जाहीर

Rohit Salunke

अपहरण करुन अल्पवयीन मुलीचे लैंगिक छळ

Tousif Mujawar