Tarun Bharat

अंकिता भंडारीच्या मारेकऱयांची होणार नार्को टेस्ट

उत्तराखंड पोलिसांनी घेतला निर्णय ः न्यायालयासमोर अर्ज

वृत्तसंस्था  / देहरादून

उत्तराखंडमधील एका रिसॉर्टची रिसेप्शनिस्ट अंकिता भंडारीच्या हत्याप्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट केली जाणार आहे. याकरता न्यायालयासमोर अर्ज करण्यात आला असून मंजुरी मिळताच नार्को टेस्ट करण्यात येईल. त्यानंतरच अंकिता भंडारी हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

तिन्ही आरोपींच्या विरोधात अधिक ठोस पुरावे मिळविण्यासाठी पालिसांनी नार्को टेस्टच्या मंजुरीकरता अर्ज दाखल केला आहे. 18 सप्टेंबर रोजी अंकिताला आरोपींनी कालव्यात ढकलून दिले होते. अंकिताचा मृतदेह 24 सप्टेंबर रोजी सापडला होता. अंकिताची हत्या रिसॉर्ट मालक आणि त्याच्या दोन सहकाऱयांनी मिळून केली होती. पोलिसांनी रिसॉर्ट मालक पुलकित आर्यसमवेत सर्व आरोपींना अटक केली आहे. पुलकित हा भाजप नेते विनोद आर्य यांचा मुलगा आहे. अंकिताच्या हत्येत पुलकितचा हात असल्याचे समोर आल्यावर भाजपने विनोद आर्य यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Related Stories

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी बाजार घसरणीत

Patil_p

दिल्ली दंगलप्रकरणी 15 जणांवर आरोपपत्र दाखल

datta jadhav

केसीआर यांच्यासमोर भाजपचे मोठे आव्हान

Patil_p

चंदा कोचर यांची याचिका फेटाळली

Patil_p

पंतप्रधान मोदी केदारनाथाचे दर्शन घेणार

Amit Kulkarni

हिंसाचारग्रस्त प. बंगालमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाचे पथक

Amit Kulkarni