चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार
टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे लवकरच मोठय़ा पडद्यावरील चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारताना दिसून येणार आहे. अंकिताला रणदीप हुड्डाचा आगामी चित्रपट ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर आधारित आहे.
या चित्रपटात आता अंकिता लोखंडेचा समावेश करण्यात आला असून निर्मात्यांनी अंकिताचा रेट्रो लुक शेअर केला आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’च्या कँपमध्ये आणखी एक पंख जोडला गेला आहे. गुणवत्तायुक्त अंकिताला समावेश करण्यात आला आहे’ असे निर्मात्यांनी म्हटले आहे.
आव्हानात्मक भूमिका साकारणे मला नेहमीच आवडत असते. अशाप्रकारची भूमिका केवळ कथेला बळ देत नाहीत, तर प्रेक्षकांवरही छाप पाडत असतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांची अशाचप्रकारची एक प्रेरक कहाणी असून ती जगासमोर मांडणे अत्यंत आवश्यक आहे. या चित्रपटात सामील झाल्याने अत्यंत आनंदी असल्याचे अंकिताने म्हटले आहे.
अंकिता यापूर्वी कंगना रनौतचा चित्रपट ‘मणिकर्णिका’मध्ये दिसून आली होती. तसेच टायगर श्रॉफच्या ‘बागी 3’मध्ये तिने काम केले होते. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाच्या माध्यमातून रणदीप हुड्डा दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवत आहे. हा चित्रपट 26 मे 2023 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.