Tarun Bharat

दुधाचे फॅट आणि वजनातील लूट थांबवा

आंदोलन अंकुशचे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना निवेदन : वैधमापनच्या अधिकाऱ्यांकडेही दिली तक्रार अन्यथा ऐन दिवाळीत नेत्यांच्या दारात आंदोलनाचा इशारा

प्रतिनिधी/कोल्हापूर

गोकुळ दुध संघाच्या प्राथमिक दुध संस्थांकडून दुध संकलनासाठी वापरल्या जाणाऱया वजन काठय़ातून आणि फॅटची तपासणी केल्या जाणाऱया मिल्कोटेस्टरच्या माध्यमातून दुध उत्पादकांची लूट केली जात आहे. गोकुळ दुध संघाने ही लूट थांबवावी अन्यथा ऐन दिवाळी सणात नेत्यांच्या दारात आंदोलन करू असा इशारा आंदोलन अंकुश संघटनेचे धनाजी चुडमुंगे यांनी गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना निवेदनाद्वारे दिला. आंदोंलन अंकुशच्या मागणीची दखल घेऊन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दुध संस्थांची तपासणी करण्याचे आदेश संकलन प्रमुख तुरुंबेकर यांना दिले.

आंदोलन अंकुशने काही दिवसापूर्वी दुध संकलनादरम्यान होणारी उत्पादकांची लूट प्रात्यक्षिकासह व पुराव्यासह समोर आणली होती. तसेच वैधमापनच्या अधिकाऱयांना घेऊन गोकुळच्या एका प्राथमिक दुध संस्थेत जाऊन अचानक तपासणी केली. यामध्ये उत्पादकांची लूट सुरु असल्याचे समोर आले. तरीदेखील गोकुळ दुध संघाकडून कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे शुक्रवारी संघटनेच्या पदधिकाऱयांनी गोकुळचे अध्यक्ष पाटील यांना सांगितले. याबाबतचे निवेदन वैधमापनशास्त्र विभागाच्या सहनियंत्रकांनाही दिले. यावेळी दुध संस्थांचे वजनकाटे तपासणी करण्यासाठी जिह्यात धडक मोहिम राबवली जाईल, अशी ग्वाही वैधमापनच्या अधिकाऱयांनी दिली. यावेळी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दिपक पाटील, दत्तात्रय जगदाळे, आण्णासो वडगावे आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : रवि इंगवलेंसह पदाधिकाऱ्यांवर विनयभंगाचा गुन्हा

दुध संस्थांमध्ये उघडकीस आलेला गैरप्रकार
शिरोळच्या वैधमापन निरीक्षकांनी शिरोळमधील चिंचवाड येथील प्राथमिक दुध संस्थेमध्ये तपासणी केली असता अनेक बेकायदेशीर बाबी समोर आल्या होत्या. यामध्ये वजन काटय़ावर शेवटच्या डिजिट वर चिकटपट्टी लावून वजन घेणे, 1 लिटरच्या दुधाच्या पिशवीचे वजन 900 मिली वजन दाखवले गेले. किलो साठी पडताळणी प्रमाणपत्र घेऊन लिटर साठी वापरले जात होते. फॅटसाठी हॅन्डलच्या मशीनचा वापर सुरु होता. गोकुळच्या पिशवीतील दुधाचे दुध संस्थेतील फॅट मशीन वर फॅट मोजले असता पिशवीवर उल्लेख असलेल्या फॅट मध्ये व प्रत्यक्षातील फॅट मध्ये 0:8 फॅट ची तफावत दिसून आली. फॅट साठी 50 मिली दुध घेतले जात होते आणि ते दुध फॅट काढल्यानंतर स्वतंत्र साठवले जात होते. या सर्व बेकायदेशीर बाबी या संकलन केंद्रावर सुरु होत्या व अशाच पद्धतीने कोल्हापूर जिह्यातील गोकुळच्या सर्वच दुध संस्थांमध्ये सुरु आहेत.

संघटनेच्या मागण्या
ज्या वजनकाटय़ाचे किलोमधून कन्व्हर्जन करून लिटरसाठी वापरले जात आहे, त्या काटय़ांची ऍक्यूरसी 100 मिलीवरून 10 मिलीपर्यंत कमी करून मगच वापरण्याबाबतचे लेखी पत्र गोकुळच्या सर्व दुध संस्थांना द्यावे. किलोचे लिटर मध्ये कन्व्हर्जन करताना म्हशीच्या दुधाची घनता जादा व गाईच्या दुधाची घनता कमी असल्यामुळे दोन्ही प्रकारच्या दुधाच्या वजनासाठी एकच वजन काटा वापरला जात आहे. दोन स्वतंत्र काटे वापरण्याच्या तत्काळ सूचना द्याव्यात. ऍटोमॅटिक मिल्क टेस्टरचा वापर सक्तीचा करावा.

Related Stories

कोल्हापुरात दक्षिण आफ्रिकेचा मालवी आंबा दाखल

Archana Banage

कोल्हापूर : कोरोनाच्या काळात रुग्णांना मिळतोय ‘आधार’

Archana Banage

KDCC Bank केडीसीसी बँकेचा सर्व कर्ज पुरवठा नियमानुसारच

Abhijeet Khandekar

Kolhapur : रेशनवरील धान्याचा हक्क सोडण्याची सक्ती मागे घ्यावी

Abhijeet Khandekar

भुदरगड भाजपच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. विनायक परुळेकर

Archana Banage

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रध्दांजली

Archana Banage