सांस्कृतिक प्रतिनिधी /फोंडा
आवेडे बोरी येथील श्री साईबाबा सेवा मंडळ ट्रस्टच्या साईबाबा मूर्ती प्रतिष्ठापना रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त सोमवारी दुसऱया दिवशी विविध कार्यक्रम पार पडले. साईबाबांची पालखी मिरवणूक असंख्य साईभक्तांच्या उपस्थितीत काढण्यात आली. गोव्यासह शेजारील राज्यातून भक्तगणांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली.
देवस्थान समिती, ट्रस्टचे पदाधिकारी, आयोजन समितीचे सदस्य यांच्या उपस्थितीत उद्योजक आशुतोष खांडेकर यांच्याहस्ते कार्यक्रम पिठाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले.
समारोप सोहळय़ाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, कला आणि संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, माजी मंत्री महादेव नाईक, कार्याध्यक्ष महादेव रघुवीर नाईक, देवस्थान अध्यक्ष दीपक कृष्णा रायकर, सचिव अक्षय नाईक, सहसचिव मुकेश नाईक, खजिनदार गुरुदास नाईक, सहखजिनदार श्रीकांत नाईक, मुख्यत्यार देऊ नाईक तसेच सभासद गोकुळदास नाईक, नारायण नाईक, आनंद नाईक, वासुदेव नाईक, उमेश बोरकर, रघू नाईक आदी मान्यवर उपस्थित असतील.