पर्वरी : पर्वरी येथील श्री वेताळ महारुद्र संस्थानात श्री वेताळ मूर्ती प्रति÷ापनेचा 33 वा वर्धापन दिन महोत्सव शनिवार दि. 23 एप्रिल रोजी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी पुण्याहवाचन नवग्रह, रूद्रपीठपूजन, लघुरुद्र स्वाहाकार, क्षेत्रपाल पूजन होईल. नंतर आरती, तीर्थप्रसाद व अन्न संतर्पण, महानैवैद्य होईल. संध्याकाळी 6.30 वाजता सुवासिनींच्या हस्ते श्रीस दिवजांची आरती, नंतर बॅन्ड वादनासमवेत श्रींची पालखीतून मिरवणूक, पावणी, आरती व तीर्थप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. वर्धापन दिनाचे यजमान श्री. व सौ. वासंती विनायक अरनोडकर, श्री. व सौ. रशिका सुरेंद्र गांवकर, श्री. व सौ. कविता कमलाकांत वळवईकर, श्री. व सौ. उत्कर्मा सुरज शेटगांवकर, श्री. व सौ. प्राजक्ता प्रदिप नाईक, श्री. व सौ. प्रसिला प्रसन्न नाईक, श्री. व सौ. गौरी सचिन वळवईकर, श्री. व सौ. निता सुरेश गडेकर हे आहेत. सर्व भक्तगणांनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहून श्री कृपेस पात्र व्हावे, असे आवाहन श्री वेताळ प्रासदिक ट्रस्ट, पर्वरीतर्फे करण्यात आले आहे.