प्रतिनिधी/ पणजी
इब्रामपूर येथली श्री सातेरी देवी व पंचायतन देवातांचा वार्षीक वर्धापनदिन उत्सव आजपासून म्हणजे रविवार दि. 9 एप्रिलपासून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा होणार आहे.
रविवार दि. 9 रोजी सकाळपासून विविध धार्मिकविधी तद्नंतर दुपारी आरती व महाप्रसाद होणार आहे. संध्याकाळी 4 वाजता संघवी महिला श्रीभुवन ढोलताशा पथक सिरसई बार्देश गोवा यांच्या उपस्थितीत श्रींच्या पालखीची वाजत गाजत गावातून मिरवणूक होणार आहे. रात्री 10 वाजता पावणीचा कार्यक्रम होणार असून 10.30 वाजता सातेरी नाट्यामंडळ इब्रामपूर यांच्यातर्फे संगीत तीन अंकी नाटक सावतामाळी सादर केले जाईल.
सोमवार 10 रोजी सकाळी धार्मीकविधी संध्याकाळी कौलप्रसाद रात्री पावणी व तद्नंतर यंग बॉयज इब्रामपूर पुरस्कृत माय कास्ताद सुन वस्ताद हे कोकणी नाटक सादर केले जाईल. मंगळवार 11 एप्रिल रोजी रात्री 10 वाजता पावणी नंतर महादेव भुमिका सेल्फ हेल्फ ग्रुप महिला मंडळ साळ गोवा सादर करणार विष्णू आसोलकर लिखीत परब्रम्ह आले भेटी सर्व कार्यक्रमांना भाविकांनी तसेच रसिकांनी उपस्थित रहाने असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
सातेरी मंदीर नव्याने बांधण्याचे काम सध्या युध्दपातळीवर ग्रामस्थ, भाविक तसेच देवीचे उपासक या कामासाठी सढळ हस्ते मदत करीत आहेत. मंदीराचे काम अर्ध्या अधिक पूर्ण झाले आहे. राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी भाविकांनी सढळहस्ते आर्थीक सहकार्य करावे. आणि देवीचा आर्शिवाद घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.