प्रतिनिधी / मडगाव
ब्रम्हपुरी-जुने गोवे येथील श्री गोमंतेश्वर संस्थानचा 75वा वर्धापनदिन सोहळा आज शुक्रवार दि. 13 रोजी भरगच्च कार्यक्रमानिशी साजरा केला जाणार आहे. या निमित्त सकाळी 9 वा. महारुद्र, दुपारी 1 वा. आरती व महाप्रसाद, संध्याकाळी 5 वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री 8 वा. दिंडीसह पालखी, रात्री 8.30 वा. पावणी व आरती व तीर्थ-प्रसाद. रात्री 9 वा. अल्पोपहार होवून कार्यक्रमाची सांगता होईल.
श्री गोमंतेश्वर देवस्थानच्या या वार्षिक वर्धापन उत्सव सोहळय़ास सर्व महाजनांनी व भक्तगणांनी आवर्जुन सहकुटुंब-सहपरिवार उपस्थित राहून तीर्थ-प्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.