सुदीप ताम्हणकर यांची मागणी
प्रतिनिधी /पणजी
राज्यात नुकताच दक्षता सप्ताह सुरू झाला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विधान केले की भ्रष्टाचार करणाऱया 10 ते 12 अधिकाऱयांना निलंबित करण्यात आले. सरकारने नावापुरतेच अधिकाऱयांना निलंबित केले आहे. जर मुख्यमंत्र्यांना या सप्ताहाचे गांभीर्य असेल तर ज्या दहा बारा अधिकाऱयांना निलंबित केले आहे त्यांची नावे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर करावी अशी मागणी अखिल गोवा बस संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केली.
प्रत्येक वर्षी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करून त्यात विधाने करून स्वतःचे हसे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत करत आहेत. अधिकारी जे भ्रष्टाचाराने पैसे गोळा करतात ते मंत्री आणि उच्च पदाधिकाऱयाकडे पोहचले जातात. दक्षता सप्ताह हे लोकांसाठी एक थट्टा ठरत आहे. दक्षता विभागाकडे अजूनपर्यंत तक्रारी प्रलंबित आहेत असा आरोप सुदीप ताम्हणकर यांनी यावेळी केला.