वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्वीडनमध्ये होणाऱया महिलांच्या यू-23 तिरंगी फुटबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली.
वरिष्ठ महिला फुटबॉल संघ या स्पर्धेसाठी स्वीडनकडे प्रयाण करणार असून तेथे हा संघ 22 ते 28 जून या कालावधीत स्वीडन व अमेरिका संघाविरुद्ध सामने खेळणार आहे. 23 सदस्यीय भारतीय संघ सध्या पुणेतील सराव शिबिरात ट्रेनिंग घेत आहे. भारतीय महिला संघ ः अदिती चौहान, लिनथोइनगम्बी देवी, श्रेया हुडा, दलिमा छिब्बर, स्वीटी देवी, रितू रानी, आशालता देवी, रंजना चानू, मनीषा पन्ना, अरिफा सईद, अंजू तमंग, कार्तिका अंगमुथू, रतनबाला देवी, प्रियांगका देवी, मार्टिना थॉकचोम, संतोष, अपूर्णा नारझरी, ग्रेस दांगमेई, सौम्या गुगुलोथ, मनीषा, प्यारी झाझा, रेणू, दुलार मरांडी.