Tarun Bharat

41 संभाव्य फुटबॉलपटूंची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

येत्या जून महिन्यात होणाऱया एएफसी आशिया चषक फुटबॉल पात्रतेच्या अंतिम स्पर्धेसाठी प्रमुख फुटबॉल प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी मंगळवारी सराव शिबिराकरिता 41 संभाव्य फुटबॉलपटूंची यादी घेषित केली.

24 एप्रिल ते 8 मे दरम्यान या फुटबॉलपटूंसाठी सराव शिबीर आयोजित केले असून घोषित करण्यात आलेले फुटबॉलपटू आणि साहाय्यक प्रशिक्षक 23 एप्रिलला बेळ्ळारीत एकत्रित येणार आहेत. यानंतर भारतीय संभाव्य फुटबॉलपटू कोलकाता येथे दाखल होणार असून त्यांचे सराव शिबीर पात्रतेच्या अंतिम फेरीपर्यंत राहील. या सराव शिबिरासाठी मुंबई सिटी एफसी आणि एटीके मोहन बागान या क्लबचे फुटबॉलपटू त्यांचे क्लबस्तरीय फुटबॉल सामने झाल्यानंतर दाखल होतील, असे अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले. 2023 साली होणाऱया एएफसी आशिया चषक अंतिम पात्र फेरी स्पर्धेसाठी भारत, हाँगकाँग, अफगाण आणि कंबोडिया यांचा ड गटात समावेश करण्यात आला असून या स्पर्धेला कोलकाता येथे 8 जूनपासून प्रारंभ होईल. भारताचा 8 जूनला पहिला सामना कंबोडियाशी होणार आहे. संभाव्य 41 फुटबॉलपटूंची यादी- गोलरक्षक-गुरप्रित सिंग संधू, अमरिंदर सिंग, पी. गिल, मोहम्मद नवाज, टीपी रेहेनेश, बचावफळी- प्रितम कोटल, आशुतोष मेहता, आशिष राय, एच. रुइवाह, राहुल भेके, संदेश झिंगन, नरेंद्र गेहलोत, चिंगलेनसाना सिंग, अन्वर अली, एस.बोस, आकाश मिश्रा, रोशन सिंग, एच.खाब्रा, मध्यफळी- उदांता सिंग, विक्रम प्रताप सिंग, अनिरूद्ध थापा, पी. हलदर, जीक्सन सिंग, जी. मार्टिन्स, लालेंगमाविया, सुहेर, लालथेंगा के., साहेल अब्दुल समद, यासीर मोहम्मद, लालियानझुआला छांगटे, सुरेश सिंग, बी. फर्नांडीस, आर. दास, के.पी. राहुल, लिस्टन कुलासो, बिपीन सिंग, ए. कुरुनियान, आघाडीफळी- मानवीर सिंग, सुनील छेत्री, रहीम अली आणि इशान पंडिता.

Related Stories

गुरप्रीत सिंग, संजू वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू

Patil_p

‘एनडीटीएल’वर आणखी 6 महिन्यांची बंदी

Patil_p

दिल्लीचा मुंबईवर 76 धावांनी विजय

Patil_p

2025 महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात

Amit Kulkarni

बाबरचे अर्धशतक

Amit Kulkarni

महिला एएफसी आशियाई चषक भारतात

Patil_p