सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिप लोगो
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आगामी होणाऱया सॅफ महिलांच्या फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी प्रशिक्षक सुरेन छेत्री यांनी रविवारी 26 सदस्यांचा संघ जाहीर केला. या स्पर्धेसाठी पुणे येथे 29 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत निवडण्यात आलेल्या महिला फुटबॉल संघासाठी सरावाचे शिबिर आयोजित केले आहे.
सॅफ महिला फुटबॉल चॅम्पियनशिप 6 ते 19 सप्टेंबरदरम्यान नेपाळमध्ये खेळवली जाणार आहे. शिबिर झाल्यानंतर भारतीय महिला फुटबॉल संघ 3 सप्टेंबरला नेपाळला प्रयाण करेल. या स्पर्धेतील भारतीय महिला फुटबॉल संघ हा विद्यमान विजेता आहे. या स्पर्धेत अ गटात भारत, मालदीव, पाक आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाचा पाकविरुद्धचा सामना 7 सप्टेंबरला होणार आहे. प्राथमिक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीय महिला संभाव्य फुटबॉल संघ-अदिती चौहान, श्रेया हुडा, एल. मैबाम देवी, सौम्या नारायणस्वामी, स्वीटी देवी, रितू राणी, आशालता देवी, रंजना चानू, मनीषा पन्ना, अरिफा सय्यद, मिशेल कॅस्टान्हा, ज्युली किशन, संतोष, अंजू तमंग, ए. कार्तिका, प्रियांगका देवी, टी. मार्टिना, संध्या रंगनाथन, काक्या पक्किरीस्वामी, कश्मिना, रतनबाला देवी, दुलार मरांडी, अपूर्णा नारझरी, सौम्या गुगुलोथ, रेणू आणि किरण पिसदा.