ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Announcement of new party by Ghulam Nabi Azad काँग्रेसला रामराम ठोकलेल्या गुलाम नबी आझाद यांनी आज घटस्थापनेच्या दिवशी नव्या पक्षाची घोषणा केली आहे. डेमोक्रेटिक आझाद पार्टी असं त्यांनी पक्षाला नाव दिलं आहे. आज काश्मीर दौऱ्यावेळी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली.
आझाद यांनी 26 ऑगस्टला काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी नवा पक्ष काढणार असल्याचे जाहीर केले होते. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांना समजेल आणि सामावून घेईल, अशा प्रकारची नावं त्यांनी पक्षासाठी जनतेतून मागवली होती. उर्दु, संस्कृत आणि मिक्स हिंदी अशी जवळपास 1500 नावं आझाद यांच्याकडे आली. त्यामधील डेमोक्रेटिक आझाद पार्टी हे नाव देत त्यांनी आज पक्षाची घोषणा केली.
यापूर्वी त्यांनी पक्षाचा अजेंडा जाहीर केला होता. माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नाही तर गर्व्हनर असेल. लोकांना त्यांच्या त्यांच्या जमिनी मिळाव्यात, तरुणांना रोजगार मिळावा, बिहारमधील कोणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये, तसेच काश्मीरी पंडितांचं काश्मीरी खोऱ्यात पुनर्वसन व्हावं, हा माझ्या पक्षाचा अजेंडा असेल, असे त्यांनी म्हटले होते.
अधिक वाचा : फॉलोअर्स वाढविण्यासाठी बिंदास काव्या स्वत:हून गायब; आई-वडिलांनी रचला होता बनाव
रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी माझ्याकडे भांडार आहे. जम्मू-काश्मीरच्या एका-एका डोंगरात पर्यटन स्थळ निर्माण करुन रोजगाराची निर्मिती होऊ शकते. मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्मय होतं ते मी केलं. जे शक्मय नव्हतं ते दिल्लीच्या माध्यमातून केलं. काश्मीरी पंडितांच्या हत्या थांबविण्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न असेल, असेही आझाद अजेंडा जाहीर करताना म्हणाले होते.