Tarun Bharat

मुरगावच्या नगराध्यक्षपदी लियो रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड जाहीर

Advertisements

प्रतिनिधी /वास्को

मुरगावच्या नगराध्यक्षपदी लियो रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. सोमवारी दुपारी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी घेण्यात आलेल्या बैठकीला निर्वाचन अधिकारी म्हणून रविशेखर निपाणीकर उपस्थित होते. आपल्याला सर्व नगरसेवकांनी मिळून नगराध्यक्षपदी निवडलेले असून सर्वांना विश्वासात घेऊनच प्रत्येक प्रभागात विकास करणार असल्याचे नवानिर्वाचित नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स यांनी म्हटले आहे.

मुरगावच्या नवीन नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी लियो रॉड्रिक्स यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला होत्या. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. नगराध्यक्षपदी निवड जाहीर झाल्यानंतर लियो रॉड्रिक्स यांनी सर्व नगरसेवकांबरोबरच वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो, वास्कोचे आमदार दाजी साळकर तसेच माजी मंत्री मिलिंद नाईक यांचे आभार मानले. या सर्वांनी मिळून आपल्याला नगराध्यक्षपदी कार्य करण्याची संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्षपदी निवड होताच मंत्री माविन गुदिन्हो व आमदार दाजी साळकर यांनी पालिका सभागृहात येऊन लियो रॉड्रिक्स यांचे अभिनंदन केले.

सर्वजण एकत्र राहिल्यास मुरगाव तालुका विकासात सर्वात पुढे जाईल- मविन गुदिन्हो

यावेळी माध्यमांशी बोलताना मंत्री माविन गुदिन्हो यांनी लियो रॉड्रिक्स यांच्या नगराध्यक्षपदी निवड होण्याने मुरगाव, वास्को व दाबोळी या तिन्ही मतदारसंघांचे एकत्रीकरण झाल्याचे मत व्यक्त केले. विकासासाठी सर्वांनी एकत्रच राहायला हवे. सर्वानी एकत्र राहिल्यास विकासात मुरगाव तालुका सर्वात पुढे असेल. मुरगाव हा औद्योगिक तालुका आहे. अर्थ व्यवस्थेची सुरवात इथूनच होत असते. नगराध्यक्ष लियो रॉड्रिक्स सर्वांसाठी चांगले कार्य करतील. विकासासाठी आपल्याही पाठींबा राहिल असे मंत्री गुदिन्हो म्हणाले. आमदार दाजी साळकर यांनी लियो रॉड्रिक्स यांचे अभिनंदन करून चांगल्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या. तर नगराध्यक्षानीही यावेळी आपणाला सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन बिनविरोध नगराध्यक्षपदी निवडलेले आहे. त्यामुळे आपण सर्वांना विश्वास घेऊनच विकास कामे करणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे तसेच संघटनमंत्री सतीष धोंड यांचाही आपण आभारी असल्याचे सांगितले.

Related Stories

विधिमंडळ नेत्याविना नवनिर्वाचितांना शपथ?

Amit Kulkarni

दुहेरी खूनातील संशयित मुंबईत जेरबंद

Amit Kulkarni

गोमंतक गौड मराठा समाजातर्फे स्व. यशवंत गावडे यांना आदरांजली

Amit Kulkarni

गोवा बनले देशातील पहिले ‘रॅबिजमुक्त राज्य’

Amit Kulkarni

वाळपई प्रभाग 9 मध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई

Amit Kulkarni

‘धिरयो’ तात्काळ बंद करा

Amit Kulkarni
error: Content is protected !!